राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी पशुपालन योजना - पहा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा
🧐 राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी -
🗣️ पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रम सुरू केले आहेत - अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी दिली आहे
👉 या योजनेमध्ये - शेतकऱ्यांना राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशींचे गट वाटप केले जाते - शेळी मेंढी गट वाटप करणे
🐃 तसेच 1000 मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य दिले जाते तसेच 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 253 तलंगा गट वाटप करणे इत्यादी योजना आहेत
🤷♂️ निवड कशापद्धतीने होणार ? - या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2021-22 या वर्षात राबविली जाणार आहे
▪️ तसेच पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करायचा आहे, त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे
🤔 अर्ज कुठं करायचा ?
📱 शेतकऱ्यांना ah.mahabms.com या संकेतस्थळावर अर्ज करता येईल तसेच मोबाईलमध्ये AH-MAHABMS नावाचे अप्लिकेशन घेऊन अर्ज करता येईल
⏲️ तसेच 4 ते 18 डिसेंबर 2021 दरम्यान शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे
📍 अधिक माहितीसाठी - शेतकऱ्यांना 1962 किंवा 1800-233-0418 या टोल फ्री क्रमांकावर देखील कॉल करता येणार आहे
🙂 राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी - पशुपालन योजना सुरू झाली आहे, हि माहिती प्रत्येक शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट जॉईन व्हा नवीन नोकरी सेवा केंद्र ग्रुप ला 👉 https://www.njscenter.in/
0 Response to "राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी पशुपालन योजना - पहा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा...."
टिप्पणी पोस्ट करा