'या' 5 ट्रिक्स वापरा आणि आपला फोन असा सुरक्षित ठेवा, जाणून घ्या संपूर्ण माहिती....
आज आम्ही तुम्हाला अशा 5 पद्धती सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही तुमचा फोन सुरक्षित ठेऊ शकता.
मुंबई : सगळ्याच गोष्टी स्मार्टफोन खूप महत्वाचे उपकरण आहे. पैसे पाठवण्यापासून ते एखाद्याशी संवाद करणे, रस्ता शोधणे, माहिती मिळवणे सगळ्यासाठीच स्मार्टफोन खूप उपयूक्त आहे. यामुळे आता बाजारात चांगल्या सुरक्षेसह स्मार्टफोन येऊ लागले आहेत. परंतु सायबर गुन्हेगारी वाढल्याने फोन आणि आवश्यक गोष्टी सुरक्षीत ठेवण्याची लोकांना गरज भासू लागली आहे. स्मार्टफोनमध्ये बँकेच्या अॅपसारखी अशी अनेक अॅप आपण ठेवतो ज्याद्वारे आपले आर्थिक व्यवहार करतो किंवा महत्वाचा मेसेज देखील आपण यावरुन पाठवतो.
आपले प्रायवेट फोटो आपल्या फोनमध्ये असतात, जे या हॅकर्सद्वारे हॅक होण्याची शक्यता आहे. अशावेळी हॅकर्सपासून फोन सुरक्षित ठेवणे फायद्याचे ठरते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा 5 पद्धती सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही तुमचा फोन सुरक्षित ठेऊ शकता.
1. स्मार्टफोन लॉक करा (Lock the smartphone)
अँड्रॉईड फोन लॉक ठेवणे सर्वात महत्वाचे आहे. याशिवाय, फोनमध्ये ठेवलेली आवश्यक कागदपत्रे सुद्धा लॉक करून ठेवू शकता.
उदाहरणार्थ, जर तुमचा फोन हरवला आणि डिव्हाईस लॉक असेल तर फोनची सुरक्षा कायम राहील.
2. विश्वसनीय सोर्सेसवरुन अॅप डाऊनलोड करा (Download the app from trusted sources)
हे महत्वाचे आहे की तुम्ही केवळ विश्वसनीय सोर्सेसवरुनच अॅप्स आणि गेम डाऊनलोड करा जेणेकरून तुमची माहिती कुणीही चोरू शकणार नाही.
Google Play Store अँड्रॉईड फोनसाठी स्टोअर आहे. इतर कोणत्याही ठिकाणावरून अॅप इन्स्टॉल केल्याने तुमची प्रायवेट माहिती लीक होऊ शकते. तसेच कोणत्या ही अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करु नका.
3. अँटी-व्हायरस सॉप्टवेयरचा वापर करा (Use anti-virus software)
अँटी-व्हायरस सॉप्टवेयरचा वापर केल्याने तुम्ही Android सुरक्षा चांगली मिळू शकते. कारण अनेकदा हॅकर्स व्हायरस पाठवून तुमची गोपनीय माहिती घेऊ शकतात.
काही अँटी व्हायरस अॅप्सच्या माध्यमातून तुम्ही मालवेयर आणि वायरस तुमच्या फोनमधून हटवू शकता आणि तुमची माहिती सुरक्षित राहील.
4. फोन अपडेट ठेवा (Keep the phone updated)
तुमच्या डिव्हाईससाठी उपलब्ध असलेले ओएसच्या नवीन व्हर्जनमध्ये फोनमध्ये अपडेट करा ते महत्वाचे आहे.
आपले स्मार्टफोन आणि अॅप्स नवीन व्हर्जनमध्ये अपडेट केल्याने डिव्हाईसवर या ठग्यांचा हल्ला होण्याची जोखीम कमी होते.
5. फोनचा पासवर्ड बदलत रहा (Keep changing the phone password)
हे आवश्यक आहे की तुमचा फोन जरी लॉक केला असेल तर त्याचा पासवर्ड सतत बदलत रहा. जेणेकरून कोणत्याही प्रकारची समस्या होणार नाही.
पासवर्ड सतत बदलत राहिल्याने हॅकर्स तुमचा फोन हॅक करू शकणार नाही. एखाद्या अॅप्लीकेशनचा पासवर्ड सेव्ह करताना सुद्धा पूर्ण काळजी घ्या म्हणजे कोणालाही याबाबत माहिती होणार नाही.
0 Response to "'या' 5 ट्रिक्स वापरा आणि आपला फोन असा सुरक्षित ठेवा, जाणून घ्या संपूर्ण माहिती...."
टिप्पणी पोस्ट करा