Google Chrome वापरत असाल तर तो आताच बंद करा, मोठ्या कंपनीकडून ग्राहकांना इशारा.
हे जगातील सर्वात लोकप्रिय वेब ब्राउझरपैकी एक आहे.
मुंबई : जर तुम्ही इंटरनेट ऍक्सेस करण्यासाठी किंवा काही तरी सर्च करण्यासाठी Google Chrome वापरत असाल तर ते आताच बंद करा. कारण ते जुणे आणि अविश्वासार्ह आहे. हा दावा आक दिग्गज आयटी कंपनी मायक्रोसॉफ्टने केला आहे. आपण बऱ्याचदा काहीही इंटरनेटवरती सर्च करण्यासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी गुगलवरती सर्च करतो. परंतु आता आपल्याला असे करणे धोक्याचे ठरु शकते.
मायक्रोसॉफ्ट संदेश पाठवत आहे
द सनच्या रिपोर्टनुसार, सध्या मायक्रोसॉफ्ट जगभरातील करोडो इंटरनेट युजर्सना गुगल क्रोम न वापरण्याचा संदेश पाठवत आहे. हा संदेश Windows 10 आणि 11 वर डिफॉल्ट ब्राउझरद्वारे दिला जात आहे. हे ब्राउझर इंटरनेट एक्सप्लोररच्या जागी 2015 मध्ये लॉन्च करण्यात आले होते.
हे जगातील सर्वात लोकप्रिय वेब ब्राउझरपैकी एक आहे.
'कालबाह्य Google Chrome'
रिपोर्टनुसार, जेव्हा एखादा यूजर 'या' ब्राउझरवर Google Chrome डाउनलोड करण्याचा प्रयत्न करतो, तत्काळ स्क्रीनवर एक वॉर्निंग मेसेज लिहिला जातो. गुगल क्रोम कालबाह्य आणि अविश्वासार्ह असल्याचे संदेशात म्हटले आहे. त्यात ताजेपणा नाही. मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, जर तुम्हाला अधिक वेगवान इंटरनेटचा आनंद घ्यायचा असेल तर मायक्रोसॉफ्ट एज डाउनलोड करा.
'नवीन वेब ब्राउझर शोधण्याची गरज नाही'
त्याचप्रमाणे, जेव्हा तुम्ही Bing शोध इंजिनवर नवीन ब्राउझर शोधण्याचा प्रयत्न करता, तेव्हा Microsoft विनंती करत आहे की, तुम्ही Microsoft Edge सोबत रहा. स्क्रीनवर एक संदेश लिहिलेला आहे, ज्यामध्ये नवीन वेब ब्राउझर डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही असे म्हटले आहे. मायक्रोसॉफ्ट एज वापरून तुम्ही वेळ आणि पैसा दोन्ही वाचवू शकता.
जगात Google Chrome चा वाटा ६७.५६% आहे.
तुम्ही तुमची गोपनीयता, चांगली सेवा आणि चांगली उत्पादकता यासाठी मायक्रोसॉफ्ट एज वापरत राहिल्याचा दावाही मायक्रोसॉफ्टकडून केला जात आहे. जगातील जागतिक डेस्क टॉप ब्राउझर मार्केटमध्ये Google Chrome चा 67.56% वाटा आहे. आकडेवारीनुसार, जगातील 3.2 अब्ज लोक दररोज Google Chrome वापरतात.
मायक्रोसॉफ्ट आणि गुगल या दोन्ही आयटी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. व्यावसायिक हितसंबंधांवरून दोघांमध्ये सतत वैर असते. मायक्रोसॉफ्ट अनेक दिवसांपासून गुगलची जागा घेऊन आपली बाजारपेठ वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
0 Response to "Google Chrome वापरत असाल तर तो आताच बंद करा, मोठ्या कंपनीकडून ग्राहकांना इशारा."
टिप्पणी पोस्ट करा