गुगल मॅपला करा बायबाय! Whatsapp उघडा आणि रेस्टॉरंट- दुकानं शोधा.
आता तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे रेस्टॉरंट आणि दुकानं शोधण्यासाठी प्रत्येकवेळी गुगल मॅपची आवश्यकता लागणार नाही. याचं कारण म्हणजे Whatsapp हे शोधून देण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे. Whatsapp उघडून तुम्ही तुमच्या जवळचे रेस्टॉरंट दुकानं, किराणा दुकानाची माहिती Whatsapp वर मिळणार आहे.
सध्या हे फीचर ब्राझिलमध्ये काही लोक वापरत आहेत. याचं टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर ते लाँच करण्यात येण्याची शक्यता आहे. Whatsapp ट्रॅकरच्या मदतीनं तुम्ही आजूबाजूच्या हॉटेल्स, रेस्टॉरंट, किराणा दुकानं अशी तुम्हाला हवी ती ठिकाणं शोधू शकता त्यासाठी तुम्हाला Whatsapp मधून बाहेर वेगळं अॅप घेण्याची गरज नाही.
Whatsapp ने व्हिडीओ कॉलिंग, व्हॉईस प्रीव्ह्यू आणि Whatsapp पे अशी काही उत्तम फीचर्स लाँच केली. त्याला युझर्सचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता नवे इमोजी आणि GIF याशिवाय Whatsapp ट्रॅकर सारख्या सुविधांवर कंपनी काम करत असून लवकरच हे फीचर्स तुमच्या फोनवरही येतील अशी आशा आहे. मात्र त्यासाठी युझर्सना थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
0 Response to "आता दुकानं आणि रेस्टॉरंटची माहिती थेट तुमच्या Whatsapp वर..."
टिप्पणी पोस्ट करा