पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत ग्राहकांना 1.30 लाखापर्यंत अर्थसहाय्य मिळते जाणुन घ्या अश्याप्रकारे...
या योजनेअंतर्गत 10 वर्षांपेक्षा अधिक वय असणारा कोणताही पात्र भारतीय नागरिक कोणत्याही शाखेत जाऊन खातं उघडू शकतो. शिवाय तुम्ही बँक मित्राच्या मदतीने देखील खातं उघडू शकता. काय आहेत फायदे?-
1) खात्यात कमीतकमी शिल्लक (मिनिमम बॅलन्स) ठेवण्याची मर्यादा नाही.
2) सेव्हिंग अकाउंट इतकेच व्याज मिळेल
3) मोबाइल बँकिंगची मोफत सुविधा
4) 10 हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा
5) PMJDY चे असे खातेधारक ज्यांनी रुपे कार्ड सुविधा घेतली आहे त्यांना 2 लाखापर्यंत अपघाती विमा कव्हर मिळतो. प्रधानमंत्री जनधन योजनेच्या
माध्यमातून देशातील गरीब लोकांचे खाते झिरो बॅलेन्सवर बँक, टपाल कार्यालये आणि राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये उघडले जाते.तुम्हाला तुमचे जनधन अकाउंट उघडायचे असेल तर जवळच्या बँकेत जा. तिथे जनधन अकाऊंटचा फॉर्म भरा. त्याठिकाणी तुमची आवश्यक सर्व माहिती द्या. अर्ज करणाऱ्या व्यक्तीला नाव, मोबाईल नंबर, बँकेच्या ब्रांचचे नाव, पत्ता, नॉमिनी (वारसदार), व्यवसाय / रोजगार, वार्षिक उत्पन्न, घरातील सदस्य संख्या, एसएसए कोड किंवा वार्ड नंबर, व्हिलेज कोड (गावाचा नंबर) याबद्दल माहिती द्यावी लागेल. तसेच PMJDY च्या वेबसाईटवरील माहितीनुसार, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड नंबर, मतदान कार्ड, राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची सही असलेले मनरेगा जॉब कार्डच्या आधारे तुम्ही तुमचे जनधन अकाउंट उघडू शकता. भारतात राहणारा कोणताही नागरिक ज्याचं वय 10 वर्षांपेक्षा अधिक आहे ते जन धन खातं उघडू शकतात.
0 Response to "आनंदाची बातमी केंद्र सरकारकडून जनधन खातंधारकांना 1.30 लाख रुपयांचा फायदा..."
टिप्पणी पोस्ट करा