पंतप्रधान मुद्रा लोन मिळवून व्यवसाय सुरू करा.

पेज

पंतप्रधान मुद्रा लोन मिळवून व्यवसाय सुरू करा.

पंतप्रधान मुद्रा लोन मिळवून व्यवसाय सुरू करा.
पंतप्रधान मुद्रा लोन मिळवून व्यवसाय सुरू करा.

    

        देशात रोजगार निर्माण करण्याऐवजी रोजगार देणारे उद्योजक निर्माण करणयावर सध्याच्या केंद्र सरकारचा भर आहे. त्यामुळे उद्योग करू इच्छिणाऱ्या तरुणांना सरकार प्रोत्साहन देतंय. हे व्यवसाय करायचे असतील तर सरकार कर्जही देतंय आणि व्यवसाय सुरू झाल्यावर तुम्ही हप्त्यांत ते कर्ज फेडू शकता. या योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर लोकांना फायदा झाला आहे. आज आम्ही याच कर्ज योजनेच्या मदतीने सुरू करता येणाऱ्या डेअरी व्यवसायाबद्दल माहिती देणार आहोत. दूध (Milk) हा भारतीयांच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक आहे, त्यामुळे त्याला आणि त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांना नेहमीच चांगली बाजारपेठ मिळते. सुरुवातीला किती खर्च येईल ? पंतप्रधान मुद्रा योजनेसाठी तयार केलेल्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये (Project Report) दिलेल्या माहितीनुसार डेअरी व्यवसाय सुरू करण्यासाठी 16.5 लाख रुपये खर्च येतो. त्यापैकी 5 लाख रुपयांची जमवाजमव तुम्हाला करावी लागेल. मुद्रा योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवलाच्या 70 टक्के रक्कम तुम्हाला उपलब्ध होईल. बँकेकडून 7.5 लाख रुपयांचं टर्म लोन आणि खेळतं भांडवल (Working Capital) म्हणून 4 लाख रुपये तुम्हाला योजनेतून मिळतील.आपण फ्लेवर्ड मिल्क, दही, बटर, पनीरपासून तुपापर्यंत वेगवेगळे पदार्थ तयार करून विकू शकता. याचबरोबर या व्यवसायाशी संबंधित आणखी अनेक उत्पादनं आहेत जी तयार करून विकल्यास तुम्हाला नफा होईल.डेअरीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण सरकारची मदत घेऊ शकता. पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत (PM Mudra Loan Scheme) तुम्हाला नव्या उद्योगासाठी आर्थिक मदत मिळू शकते. यात भांडवलासाठीच्या मदतीचाही समावेश आहे. तुम्ही जेव्हा या स्कीमबाबत जाणून घेता, तेव्हा तुम्हाला योजनेतील सवलतींची अधिक माहिती दिली जाते, तसंच तुम्हाला सरकारकडून मिळणाऱ्या मदतीचं स्वरूप लक्षात येतं. 

https://mahanews.njscenter.in/2021/06/blog-post.html

0 Response to "पंतप्रधान मुद्रा लोन मिळवून व्यवसाय सुरू करा."

टिप्पणी पोस्ट करा

Ads

Ads Center 1

#

Ads Center 2

#

Ads Center 3

#