रिलान्स जिओ कडून ५ नवीन प्लॅन लॉन्च. जिओ च्या या ५ प्लॅन वर मिळावा अनलिमिटेड डाटा.
नवी दिल्लीः रिलायन्स जिओने नुकताच आपला बंद केलेला ९८ रुपयांचा प्री पेड प्लान पुन्हा एकदा लाँच केला आहे. कंपनीने हा प्लान लाँच करताना त्याची वैधता कमी केली आहे. आता कंपनीने एकाचवेळी पाच नवीन प्रीपेड प्लान लाँच केले आहेत. जिओने नवीन प्लानला जिओ फ्रीडम प्लान (Jio Freedom Plans) नाव दिले आहे. जिओच्या या पाच नवीन प्रीपेड प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात तुम्हाला डेली डेटाची कोणतीही लिमीट नाही. म्हणजेच तुम्हाला रोज जितका डेटा वापरायचा आहे तितका तुम्ही वापरू शकता. अनेक साऱ्या प्लानसोबत रोज १ जीबी डेटा किंवा १.५ जीबी डेटा मिळतो परंतु, जिओच्या नवीन फ्रीडम प्लान सोबत असे काही नाही. या प्लानमध्ये नो डेली लिमिट मिळते. तसेच सर्व नेटर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि माय जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते.
Jio Freedom Plan: १२७ रुपयांचा प्लान
या प्लानमध्ये युजर्संना एकूण १२ जीबी डेटा मिळेल. सोबत १५ दिवसांची वैधता मिळेल. रोज १०० एसएमएस सोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि माय जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस मिळेल.
Jio Freedom Plan: २४७ रुपयांचा प्लान
या प्लानमध्ये ३० दिवसांची वैधता सोबत एकूण २५ जीबी डेटा मिळेल. यात अनलिमिटेड कॉलिंग सोबत रोज १०० एसएमएस आणि माय जिओ अॅप्सचे सबस्क्रीप्शन मिळेल.
Jio Freedom Plan:४४७ रुपयांचा प्लान
जिओच्या या प्लानमध्ये ६० दिवासांची वैधता मिळेल. याशिवाय, ५० जीबी डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस तसेच जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस मिळेल.
Jio Freedom Plan: ५९७ रुपयांचा प्लान
या प्लानमध्ये ग्राहकांना ९० दिवसांची वैधता सोबत ७५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सबस्क्रीप्शन मिळेल.
Jio Freedom Plan:२३९७ रुपयांचा प्लान
या प्लानमध्ये ३६५ दिवसांची वैधता सोबत एकूण ३६५ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, रोज १०० एसएमएस मिळते. यात जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस मिळेल.
0 Response to "रिलान्स जिओ कडून ५ नवीन प्लॅन लॉन्च. जिओ च्या या ५ प्लॅन वर मिळावा अनलिमिटेड डाटा."
टिप्पणी पोस्ट करा