नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 22 रुग्ण दगावल्याची माहिती.

पेज

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 22 रुग्ण दगावल्याची माहिती.

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 22 रुग्ण दगावल्याची माहिती.

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 22 रुग्ण दगावल्याची माहिती. 

 
नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 22 रुग्ण दगावल्याची माहिती

TV9 मराठी न्युज नाशिक :
   राज्यात एकीकडे ऑक्सिजनची कमतरता भासत असताना दुसरीकडे नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याची धक्कादायक दुर्घटना झाली आहे. या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 22 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान सद्यस्थितीत अग्निशमन दलाकडून गळती थांबवण्याचे काम सुरु आहे.नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाची एकच गर्दी पाहायला मिळाली. या रुग्णालयात 123 लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यातील २२ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर २२ जण मृत्यूच्या दाढेत असल्याचे बोललं जात आहे.गळती रोखण्यासाठी प्रयत्न नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानंतर या रुग्णालयात अग्निशमन दल दाखल झालं आहे. या ठिकाणी ऑक्सिजन टाकीतील गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. या संपूर्ण घटनेमुळे रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.दरम्यान ही घटना नेमकी कशी घडली, हा ऑक्सिजन टँक लीक कसा झाला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र या हलगर्जीपणामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. (Nashik Oxygen Tank Leak) 22 जण दगावल्याचा सुधाकर बडगुजर यांचा दावा मी स्वत: या रुग्णालयात आत जाऊन सर्व बेड चेक केले. यात 61 रुग्ण हे गंभीर आहेत. तर 22 जण दगावल्याची माहिती मिळत आहे. गेल्या दीड तासापासून ते ऑक्सिजनसाठी तडफडत होते. पण त्यांना ऑक्सिजन न मिळाल्याने ते मृत्यूमुखी पडले आहेत, अशी माहिती शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली.

      ज्या एजन्सी ऑक्सिजन प्लांट बसवला असेल, त्यांनी या ठिकाणी टेक्निकल टीम ठेवणं गरजेचे होतं. ऑक्जिन प्लांट हे डॉक्टर बघत नाहीत. ते टेक्निकल काम असतं. मात्र त्यांनी टेक्निकल टीम या ठिकाणी का ठेवली नाही? असा सवालही सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.अनेक नातेवाईक आत रडत होते, आम्हाला ऑक्सिजन मिळवून द्या. राज्य सरकारने 11 लोक हे प्राथमिक स्वरुपात सांगितले आहे. पण मी दोन वॉर्डात जाऊन पेशंट बघितले त्यातील निम्म्या रुग्णांचा मृत्यू झाला असावा. जर टेक्निकल टीम ठेवली असती तर दुर्घटना झाली नसती. त्यामुळे हलगर्जीपणा करण्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणीही सुधाकर बडगुजर यांनी केली.

TV 9 मराठी 


0 Response to "नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 22 रुग्ण दगावल्याची माहिती."

टिप्पणी पोस्ट करा

Ads

Ads Center 1

#

Ads Center 2

#

Ads Center 3

#