अवकाळी पावसामुळे संत्राउत्पादक व कांदा उत्पादक शेकऱ्यांना फटका !
अमरावती : (21-03-2021) इतर शेतकऱ्यांप्रमाणे आपल्या शेतातही संत्र्याची बाग असावी जणेकरून आपल्या कुटुंबाच्या पालन पोषणासाठी ती संत्रा बाग उपयोगाला येईल. शेतात विहरीत तेव्हा पाणी नव्हते म्हनून तो खचून गेला नाही. त्याने गावातून ड्रम ने पाणी आणून मग अख्य कुटुंब रगरगत्या उन्हात डोक्यावर हंडा घेऊन संत्राच्या झाडाला पाणी टाकायचो आणि त्याच मुळे तबल ३०० झाडांची संत्रा बाग उभी केली. आज त्या बागेतील झाडे आठ वर्षाची झाली आता हळूहळू संत्राचे उत्पादन सुरू होणार होते, त्यामुळे पैसे येणार होते. अशी आशा पल्लवित झाली होती. मात्र, शुक्रवारी मध्यरात्री सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस आणि एवढी कमी म्हणून की काय गारपीट आली आणि एका रात्रीत होत्याच नव्हते झालं.
तळहाताच्या फोळाप्रमाणे जपलेले संत्राचे पीक कायमस्वरूपी जमीनदोस्त झाले आहे. दोन पैसे मिळावे म्हणून रामेश्वर जगताप यांनी आपल्या शेतात आठ वर्षपूर्वी संत्राच्या झाडाची लागवड केली.
झाडे लावल्या नंतर अचानक कोरडा दुष्काळ पडला आणि शेतातील भरोशाची विहरीला ही कोरड पडली पण जिद्द होती झाडे जगवण्याची अशाही परिस्थितीत अख्या कुटूंबाने डोक्यावर हंडा घेतला
आणि ही बाग फुलवली आता तिची गोड फळे चाखायची वेळ आली आणि दोन दिवसांपूर्वी आलेल्या गारपीटने होत्याच नव्हतं झालं.
जगताप यांच्या कडे एकूण 3 एकर शेती आहे आणि त्या शेतीत संत्राची झाडे आहे. आठ वर्षची असल्याची असलेले झाडे आता संत्रा द्यायला लागली होती.
यंदा उत्पादन सुरू होणार होते. सर्वाच्या आशा पलवित झाल्या होत्या पण वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ४० झाडे उलमळून पडली असल्याचे त्यांचे वडील सांगतात.
-------------------------------------
कहाणी एकट्या रामेश्वर जगताप यांचीच नाही तर अशीच परिस्थिती अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे. या संकटात कांदा उत्पादन शेतकरी हवालदिल झाले आहे.
कांदा उत्पादन शेतकरी: गजानन जोरे यांनी आपल्या दोन एकर शेतात उन्हाळी कांद्याची लागवड केली होती. त्यासाठी त्यांनी 70 हजार रुपयांचा खर्च केला. आता कांदा काढायला आला होता.
कांदा काढून घेतला की लोकांचे उसनवार आणलेले पैसे देऊन देऊ असे स्वप्न त्यांनी पाहिले होते.
मात्र, अचानकच आलेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने हातातोंडाशी आलेल्या कांद्याच्या पिकाला अक्षरशः झोडपून काढले आहे.
शेतातील काढणीला आलेल्या कांद्याला गारपीटीचा मार बसल्याने कांद्याला आता सड सुरू झाली आहे.
जो कांदा काढून वाढवण्यासाठी घातला होता तो कांदा आत्ता सडू लागला आहे. या वर्षी त्यांना दोन लाखांचे उत्पन्न होणार होते.
अमरावती जिल्हात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने 9 तालुक्यात काढनीला आलेल्या गहू, हरभरा व कांदा या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, आता गहू व हरभरा, कांदा काढण्याची तयारी शेतकरी करत होते.
मात्र हातात आलेलं पीक निसर्गाने हिरावून नेलं आहे. यात सर्वाधिक गहू पिकांचं नुकसान झाले यात गहू पार जमीनदोस्त झाला आहे. आज सायंकाळी जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील करजगाव, शीरसगाव तसेच मोर्शी तालुक्यात पुन्हा गारपीट झाली त्यामुळे आता सरकारने तातडीने मदत देण्याची गरज आहे.
0 Response to "अवकाळी पावसामुळे संत्राउत्पादक व कांदा उत्पादक शेकऱ्यांना फटका !"
टिप्पणी पोस्ट करा