फोन रात्रभर चार्ज करणे धोकादायक, या 5 Tricks वापरा आणि फोनचा स्फोट टाळा...
मुंबई : आपण अनेकदा फोनची बॅटरी फुटण्याच्या बातम्या ऐकल्या आहेत. OnePlus Nord 2 स्मार्टफोनचा स्फोट झाल्याची बातमी अलीकडेच व्हायरल झाली आहे. या स्फोटमुळे फोन युजरचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु या स्फोटाचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. OnePlus Nord 2 या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च झाल्यापासून अनेक अशा अनेक घटना घडल्या आहेत. यावर कारण स्पष्ट करताना कंपनीने सांगितले की, बहुतेक प्रकरणांमध्ये ही त्रुटी ग्राहकांकडून आली आणि उत्पादन वापरण्यास सुरक्षित आहे.
फोनचा स्फोट हा अनेक गोष्टींमुळे होऊ शकतो. त्यापैकी कंपनीची खराब गुणवत्ता चाचणी हे एक कारण असू शकते, तर दुसऱ्या कारणांसाठी ग्राहक जबाबदार आहेत. आजकाल फोनच्या बॅटरी ब्लास्टिंगच्या घटना खूप सामान्य झाल्या आहेत, आम्ही आज तुम्हाला यामागील पाच कारणे तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला या गोष्टींची माहिती घेणे शक्य होईल.
तुमच्या फोनवर या 5 गोष्टी करणे टाळा
खराब बॅटरीने फोन चालवू नका
फोनची बॅटरी लवकर संपण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे खराब बॅटरी. अनेकदा फोनची बॅटरी खराब असल्यामुळे, त्यात शॉर्ट सर्किट होते. जेव्हा बॅटरी खराब होते तेव्हा बहुतेक प्रकरणांमध्ये ती फुगते, जी मागील पॅनेलकडे पाहून ओळखली जाऊ शकते. जर तुम्हाला कधी बॅटरी लवकर संपण्याची समस्या आली तर तुमचा फोन ताबडतोब सर्विस सेंटरमध्ये घेऊन जा. म्हणजे पुढील धोका तुम्हाला टाळता येतील.
नेहमी खरा किंवा ओरिजनल चार्जर वापरा
बॅटरी स्फोटाच्या घटनांमागे हे एक सामान्य कारण आहे. ब्रँड त्यांच्या ग्राहकांना नेहमी अधिकृत चार्जर वापरण्यास सुचवतात, परंतु ग्राहकांकडून अनेकदा हे टाळले जाते. मूळ चार्जर व्यतिरिक्त फोन चार्ज करणे नेहमीच जोखमीचे असू शकते आणि याचे कारण असे आहे की थर्ड-पार्टी चार्जरमध्ये मोबाइल डिव्हाइससाठी आवश्यक वैशिष्ट्ये नसतात. ज्यामुळे फोनमध्ये स्फोट होतो.
बहुतेक प्रकरणांमध्ये, स्वस्त आणि अप्रमाणित चार्जर तुमचा फोन जास्त गरम करू शकतात आणि बॅटरीसह अंतर्गत भाग खराब करू शकतात. म्हणूनच तुमचा फोन चार्ज करण्यासाठी नेहमी अधिकृत किंवा ओरिजनल चार्जरच वापरा.
फोन रात्रभर चार्ज करू नका
रात्रभर चार्जिंग केल्याने फोनची बॅटरी देखील स्फोट होऊ शकते. आपल्यापैकी बर्याच जणांना आपला मोबाईल फोन रात्रभर चार्जरवर ठेवण्याची सवय असते, परंतु हे लक्षात घ्या की, ते तुमच्या फोनसाठी चांगले नाही.
फोन जास्तवेळ चार्जिंग केल्याने फोन अति तापणे, शॉर्ट-सर्किट आणि कधीकधी स्फोट देखील होऊ शकतो. त्यामुळे 100 टक्के फोन चार्ज होण्यासाठी देखील तुमचा फोन ठेऊ नका कारण ते देखील तुमच्या फोनला खराब करु शकतं.
थेट सूर्यप्रकाश किंवा पाण्यापासून फोनचे संरक्षण करा
फोनची बॅटरी थेट सूर्यप्रकाश किंवा पाण्याच्या संपर्कात आल्याने बॅटरीचा स्फोट होऊ शकतो. जास्त उष्णता फोनमधील सर्किटला अस्थिर करू शकतात, ज्यामुळे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड सारख्या वायू तयार करू शकतात. ज्यामुळे बॅटरी फुगते आणि त्याचा विस्फोट होऊ शकतात. त्यामुळे फोन थेट सूर्यप्रकाशात ठेऊ नका. त्याचप्रमाणे, फोन पाण्याच्या संपर्कात आल्याने बॅटरीसह अंतर्गत भाग खराब होऊ शकतात, ज्यामुळे देखील तुमच्या फोनचा स्फोट होऊ शकतो.
सतत फोन वापरू नकाबहुतेक प्रकरणांमध्ये, मल्टी-टास्किंग आणि गेमिंग सत्रांच्या परिणामी प्रोसेसर फोन गरम करू शकतो. बॅटरी खराब होऊ शकते. हे टाळण्यासाठी, OEM ने थर्मल लॉक वैशिष्ट्य जोडण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे फोन गरम होण्याच्या समस्या नियंत्रणात राहतात. त्यामुळे तुमचा फोन जर मल्टी-टास्किंग किंवा गेमिंगदरम्यान गरम होत असल्यास, तुमच्या फोनला थोडा आराम द्या.
0 Response to "फोन रात्रभर चार्ज करणे धोकादायक, या 5 Tricks वापरा आणि फोनचा स्फोट टाळा..."
टिप्पणी पोस्ट करा