ब्रेकिंग अपडेट
शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची बातमी ! खत , बियाणे नाही मिळाले - तर या नंबर वर करा कॉल
राज्यात शेतीविषयक सर्व गोष्टींचा पुरवठा सुरळीत व्हावा - आणि त्यामध्ये काही अडचण आल्यास त्याचे निवारण व्हावे म्हणून -
कृषी आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे - कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी याबाबतचे निर्देश दिलेत
राज्य सरकारने दिलेल्या माहिती प्रमाणे - खते, बियाणे तसेच इतर अडचणी आल्यास शेतकरी 8446117500 हा भ्रमणध्वनीवर
तसेच 18002334000 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा - तसेच काही अडचण किंवा तक्रार असेल तर controlroom.qc.maharashtra@gmail.com यावर मेलवर - तक्रार सुद्धा नोंदवता येईल
दरम्यान वरील दोन्ही हेल्पलाइनवर - सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क साधता येईल - असे महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.
0 Response to "शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची बातमी ! खत , बियाणे नाही मिळाले - तर या नंबर वर करा कॉल"
टिप्पणी पोस्ट करा